कूर्ग डायरीज २
पूर्वतयारी
हॉटेल बुकिंग आणि विमान तिकिटांचे आरक्षण अगोदरच झाल्यामुळे जीव तसा निर्धास्तच होता. तत्पूर्वी कूर्ग बद्दल खूप जणांकडून माहिती घेतली होती. आंतरजालावरून सुद्धा खूप माहिती मिळाली. कूर्ग हे मुळात एक थंड हवेचे ठिकाण , अगदी आपल्या महाबळेश्वर प्रमाणे . पण कूर्ग मध्ये महाबळेश्वर सारखी स्ट्रॉबेरी नाही पिकत बरं का. तिथले मुख्य आकर्षण म्हणजे कॉफिचे मळे . कू र्गचा बहुसंख्य भाग हा कॉफि आणि मिरी किंवा वेलची अश्या मसाल्याच्या पिकांनी व्यापलेला आहे.
कूर्गची कॉफि जशी प्रसिद्ध तसेच तिथले संत्र सुद्धा प्रसिद्ध आहे. आपल्या नागपूरच्या संत्र्यापेक्षा आकाराने लहान असलेले हे कूर्गचे संत्र चवीला सुद्धा थोडे आंबटच असते. मीठासोबत या संत्र्याची चव भलतीच खुलते. कूर्गची वेलची आणि मिरीसुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे.
मुळात कूर्ग हा कर्नाटकातील एक महत्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात कोडुगु आणि मदिक्केरी हि दोन ठिकाणे थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. पर्यटनाबरोबरच कॉफी आणि मसाले यांचा व्यापार हा इथला उत्पन्नाचा मुख्य स्रोत. कॉफीचे विस्तीर्ण मळे हे बड्या धेंडांच्या मालकीचेच आहेत. यात बरेचसे उद्योजकहि आहेत. कॉफी आणि मिरीचा मुख्य मोसम हा डिसेम्बर आणि जानेवारीचाच. या मोसमात कॉफीचे फळ धरते आणि पिकते सुद्धा. मी खरेच खूप नशीबवान कारण मला ह्या कॉफी बेरीज पाहायला मिळाल्या. कॉफीचे पीक हे माझ्या माहितीप्रमाणे वर्षातून एकदाच घेतले जाते. त्यामुळे आम्ही सर्व खूप नशीबवान ठरलो. मिरीच्या वेलींना सुद्धा फळ धरले होते. त्यामुळे हा अनुभव आमच्यासाठी खूपच खास ठरला. कॉफीच्या विस्तीर्ण मळ्यांमध्ये सुपारीची आणि सिल्व्हर ओक ची उंचच्या उंच झाडे आणि त्यांना लपेटलेल्या मिरीच्या वेली हे दृष्य खूपच विहंगम होते हे निश्चित.
अश्या या निसर्गरम्य कूर्ग मध्ये आम्ही आमचे ४ दिवस व्यतीत करणार आहोत ह्या कल्पनेनेच मनात आनंदाचे तुषार उसळले आणि आम्ही आमच्या प्रवासाची तयारी पूर्ण केली. माझ्या दोन्ही कन्या खूपच खुशीत होत्या कारण त्यांचा पहिलावहिला विमान प्रवास होणार होता. माझी आई सुध्दा या निमित्ताने पहिल्यांदाच विमानात बसणार होती म्हणून तिचे मनसुद्धा खूप खुश होते.
शेवटी कूर्गला प्रस्थान करण्याची सर्व तयारी झाली आणि तो दिवस जवळ येऊन पोहोचला ज्याची आम्ही जवळपास महिनाभर वाट पाहत होतो. २७ डिसेम्बर २०१९......

No comments:
Post a Comment